वृत्तसंस्था/ बर्मिंगहॅम
मंगळवारपासून येथे सुरू झालेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या अखिल इंग्लंड चॅम्पियनशिप आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या एच. एस. प्रणॉयने पुरुष एकेरीत विजयी सलामी दिली. त्याने सलामीच्या सामन्यात चीन तैपेईच्या वेंगचा सरळ गेम्समध्ये पराभव केला. पुरुष एकेरीच्या बॅडमिंटन मानांकनात नवव्या स्थानावरील एच. एस. प्रणॉयने चीन तैपेईच्या झू वेई वेंगचा 21-19, 22-20 अशा सरळ गेम्समध्ये 49 मिनिटांच्या कालावधीत फडशा पाडून दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला. आता दुसऱ्या फेरीत त्याची लढत इंडोनेशियाचा गिनटिंग आणि थायलंडचा डब्ल्यू केनटेफॉन यांच्यातील विजयी खेळाडूबरोबर होईल