प्रतिनिधी /बेळगाव
हल्दी ज्वेलर्सतर्फे आयोजित 1 ग्रॅम दागिन्यांचे भव्य प्रदर्शन व सेलला बेळगावकरांच्या भरघोस प्रतिसादानंतर सेल आणखी दोन दिवस वाढविण्यात आला आहे. या प्रदर्शनात 3000च्या दागिने खरेदीवर एक नेकलेस मोफत देण्यात येत आहे.
हल्दी ज्वेलर्सतर्फे बेळगाव शहरात पहिल्यांदाच देसाई बिल्डींग गोगटे सर्कल रेल्वेस्टेशनजवळ स्टेशन रोड येथे एक ग्रॅम सोन्याचे व मोत्याच्या दागिन्यांचे भव्य प्रदर्शन व सेल सुरू आहे. या प्रदर्शनात मोत्यांचे कानातील दोनशे रुपयापासून, लक्ष्मी हार 500 पासून, एक ग्रॅम शॉर्ट मंगळसूत्र 300 रुपयापासून, एक ग्रॅम राणी हार दोन हजारापासून, 1 ग्रॅम नेकलेस हजारपासून, एक ग्रॅम कर्णफुले पाचशेपासून, एक ग्रॅम मोती बँगल्स 500पासून तसेच विविध प्रकारचे एक ग्रॅम सोन्याचे मोत्यांचे आभूषण विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
तसेच तीन हजार रुपयांच्या खरेदीवर एक ग्रॅम सोन्याचे नेकलेस मोफत मिळेल व जे ग्राहक खरेदी करताना 14 मे व 21 मे रोजी दै. ‘तरुण भारत’मधील प्रसिद्ध झालेले जाहिरातीचे कात्रण किंवा या बातमीचे कात्रण सोबत आणतील त्या ग्राहकांना 1 ग्रॅम सोन्याची गोल्ड प्लेटिंग गोप मोफत मिळणार आहे.
तरी बेळगावकरांनी या ज्वेलरी प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन हल्दी ज्वेलर्सचे व्यवस्थापक नंदू चौरे यांनी केले आहे. प्रदर्शन व सेल शेवटचे दोनच दिवस राहणार आहे.