वृत्तसंस्था/ कराची
पाक क्रिकेट निवड समिती प्रमुखपदी माजी फलंदाज हरुण रशिदची नियुक्ती केल्याची घोषणा पीसीबीचे चेअरमन नझीम सेठी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेमध्ये केली.
लाहोरमध्ये पीसीबीचे चेअरमन सेठी यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. पीसीबीने अलीकडेच चौदा सदस्यांची क्रिकेट व्यवस्थापन समिती स्थापन केली होती. या समितीचे प्रमुख पाकचे पंतप्रधान शाबाज शरिफ हे आहेत. 69 वर्षीय हरुण रशिद यांचा यापूर्वी पाकच्या व्यवस्थापन समितीमध्ये समावेश होता. आता त्यांच्याकडे निवड समिती प्रमुखपद सोपविल्याने ते व्यवस्थापन समिती सदस्याचा राजिनामा देणार आहेत. हरुण रशिद यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 23 कसोटी आणि 12 वनडे सामन्यात पाकचे प्रतिनिधीत्व केले आहे. गेल्या वर्षी पीसीबीच्या हायपरफॉर्मन्स सेंटरचे संचालकही होते. त्यांनी या संचालक पदाचा अलिकडेच राजिनामा दिला होता.