सावंतवाडी : प्रतिनिधी
येथील मोती तलावात बुडणाऱ्या वृध्द महिलेचा जीव सावंतवाडी पोलिसांसह माजी नगरससेवकांना वाचवण्यात यश आले आहे. माजी नगरसेवक सुरेश भोगटे, पोलीस कर्मचारी प्रवीण वालावलकर, जगदीश दुधवडकर यांनी त्या वृद्ध महिलेला वाचविले. याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी एक वयोवृद्ध महिला तलावाच्या पाण्यामध्ये पडून झाडाच्या फांदीला पकडून जीव वाचवण्यासाठी मदतीसाठी हात उंचावत होती. सकाळी मॉर्निंग वॉक साठी फिरत असताना येथील नागरिकांना ती दिसून आली. नागरिकांनी प्रसंग ओळखून धावा धाव करून तलावातील होडीच्या साह्याने तिला पाण्यातून बाहेर काढून वाचविले .
तिला उपचारासाठी कुटीर रुग्णालयात दाखल केले आहे.