प्रतिनिधी/ पणजी
गोवा सरकार कामगारांचे हित साधण्यास समर्थ आहे. गोव्यातील सर्व कष्टकरी कामगारांना आपण योग्य तो न्याय मिळवून देणार, असे महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी सांगितले.
आज आंतरराष्ट्रीय मजूर दिवस या निमित्ताने गोव्यातील कष्टकरी मजुरांना उद्देशून त्यांनी संदेश दिला असून कामगारांना या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. लवकरच आम्ही कामारांसाठी अनेक योजना जाहीर करणार असून त्या सर्व योजनांचा लाभ कामगारांना मिळवून दिला जाईल. कामगारांच्यासाठी बऱयाच प्रमाणत निधी उपलबध आहे. परंतु काही नियमांमुळे तो वापराला जात नाही. आणि त्यातून कामगारांवर अन्याय होतो. हा अनयाय दूर करण्यासाठी आपण त्वरित पावले उचलणार असल्याचे मंत्री मोन्सेरात म्हणाले.
त्यांनी राज्यातील सर्व कामगारांना शुभेच्छा दिल्या आहेत. कामगारांचे राज्यासाठी व राज्यातील उद्योगक्षेत्रासाठी मोठे योगदान आहे ते आम्ही विसरू शकत नाही, असे मंत्री मोन्सेरात म्हणाले.