कारण जाणून घेतल्यावर व्हाल अवाप्
एका महिलेने अलिकडेच स्वतःच्या मांजरासोबत विवाह केला आहे. या मांजराचे नाव इंडिया आहे. देबरोह हॉग या महिलेने हे कृत्य केले असून ती लंडनमध्ये राहते. हॉगने स्वतःच्या मांजरासोबत विवाह केला, कारण ती जिथे भाडय़ाने राहत आहेत, तेथे तिचे मांजर देखील राहू शकेल. कारण यापूर्वी तिच्या सर्व घरमालकांनी तिला पाळीव प्राणी ठेवण्यास मनाई केली होती. अशास्थितीत या महिलेने युक्ती शोधून काढत मांजरासोबतच विवाह केला आहे.
हे मांजर आता कायदेशीर स्वरुपात माझ्या मुलांनंतर माझ्या जीवनाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. मांजरासोबत विवाह करून मी भविष्यातील घरमालकांना आम्ही एक पॅकेज म्हणून राहायला येत आहोत हे सांगू शकेन. अशा स्थितीत आम्ही कुठल्याही स्थितीत वेगळे होऊ शकत नसल्याचे हॉगने म्हटले आहे.
माझ्या मुलांइतकीच मांजराची मला गरज आहे. आता मी रस्त्यांवर राहू शकते, परंतु मांजराला वाऱयावर सोडू शकत नसल्याचे हॉगचे म्हणणे आहे. यापूर्वी तिला स्वतःच्या दोन हस्की श्वानांना सोडून द्यावे लागले होते. कारण तिच्या घरमालकाने त्यांना घरातून बाहेर काढण्याची धमकी दिली होती. तसेच एका मांजरालाही तिला सोडून द्यावे लागले होते.
49 वर्षीय हॉगने मांजरासोबत 19 एप्रिल रोजी दक्षिणपूर्व लंडनच्या पार्कमध्ये विवाह केला. यादरम्यान जोडप्याने टय़ुक्सिडो-स्टाइल आउटफिट्स परिधान केले होते, कारण मांजर एक टय़ुक्सिडो कॅट प्रजातीचे आहे. या विवाहात हॉगचा मित्रपरिवार देखील उपस्थित होता. या मांजराचा 2020 मध्ये अपघात झाला होता असे हॉगने सांगितले आहे.
यापूर्वी हॉग स्वतःच्या पाळीव प्राण्यांना घरमालकाच्या आक्षेपामुळे स्वतःसोबत आणू शकली नव्हती. कारण घरमालक प्राण्यांना ठेवण्यास मनाई करत होते. याचमुळे तिला स्वतःच्या तीन पाळीव प्राण्यांना अन्यत्र हलवावे लागले होते.