संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी खायची इच्छा प्रत्येकालाच असते. पण डायट करणारे लोक ते हेल्दी आहे की नाही हा विचार करून चहासोबत खाणं टाळतात. पण आज आपण चहासोबत खाण्यासाठी हेल्दी आणि रुचकर अशी रेसिपी पाहणार आहोत. जी तुम्ही लहान मुलांनाही खाऊच्या डब्यात देऊ शकता.
साहित्य
अर्धा कप ओट्स
अर्धा कप बेसन
पाव चमचा बेकिंग सोडा
१ चमचा बेकिंग पावडर
२ चमचे तूप
अर्धा कप गूळ (किसलेला)
१ चमचा व्हॅनिला इसेन्स
१ चमचा व्हिनेगर
२ चमचे दूध
आवडीनुसार चोको चिप्स
कृती
प्रथम एका भांड्यात ओट्स, बेसन, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर एकत्र करून मिक्स करून घ्या.नंतर दुसऱ्या भांड्यामध्ये तूप आणि गूळ मिक्स करून घ्या. मिश्रण चांगले एकजीव करुन झाल्यांनतर त्यात व्हॅनिला इसेन्स आणि व्हिनेगर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे ह्या मिश्रणाचा रंग बदलतो.
मिश्रण चांगले हलकं होईल. नंतर तयार मिश्रणात ओट्स आणि बेसनचे मिश्रण टाकावे आणि मिक्स करून घ्यावे. नंतर त्यात १ टिस्पून दूध टाकून मिक्स करावे.
नंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवावी व मिश्रणात चोको चिप्स टाकून मिक्स करावे. नंतर एका ताटाला तूप लावून त्यात तयार मिश्रणाचे छोटे गोळे करून घ्यावे व कुकीज चा आकार देऊन ताटात ठेवा. या गोळ्यांवर तुम्ही आवडीनुसार चोको चिप्स ही लावू शकता. आता हे ताट कढईमध्ये ठेवून वर झाकण लावून २० ते २५ मिनिटे बेक करून घ्यावे. नंतर २० मिनिटांनंतर चेक करा. ओट्स चे कुकीज तयार आहे.