► प्रतिनिधी/ बेळगाव
सहा महिन्यांच्या अनाथ बालकावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळातील तज्ञ डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया केली असून या बालकावरील धोका टळला आहे.
सहा महिन्याच्या अनाथ मुलाला श्वसनाच्या त्रासावर उपचारासाठी डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळात आणण्यात आले होते. पीडीए (पेटंट डक्टस आर्टीरियोसस) या हृदय समस्येने जन्मापासूनच हे बालक त्रस्थ असल्याचे तपासणीत आढळून आले. श्वास कोषातील अतिरक्त दाबामुळे या बालकाचा जीवन-मरणाचा संघर्ष सुरू होता.
ऑस्ट्रेलिया येथे प्रशिक्षण पूर्ण केले बालरोग हृदय शस्त्रचिकित्सक डॉ. गनंजय साळवे यांनी दोन तास शस्त्रक्रिया या बालकावर केली आहे. पीडीएमुळे श्वासकोषाला धक्का पोहोचतो. त्यामुळे वेळीच त्यावर उपचार करण्याची गरज असते. रोटरी फौंडेशनच्या गिफ्ट ऑफ लाईफ योजनेंतर्गत हृदय रोगावरील उपचारासाठी मुलांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेंतर्गत आतापर्यंत सहा बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. डॉ. मनीषा भांडणकर, डॉ. वीरेश मानवी, डॉ. निधी मानवी, गोयल, डॉ. आनंद वाघराळी, आदी डॉक्टरांचे इस्पितळाचे वैद्यकीय संचालक कर्नल एम. दयानंद, केएलई संस्थेचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे आदींनी अभिनंदन केले आहे.