कारखाना सभासदांच्या मालकीचा व्हावा, यासाठी काम केलेल्या हजारो हातांचे आणि सभासदांचा मी आभारी आहे. सभासदांच्या उत्साही प्रतिसादाबद्दल त्यांचे मनापासून त्यांचे धन्यवाद मानतो अशी प्रतिक्रिया आमदार सतेज पाटील यांनी दिली आहे. छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीसाठी आज मतदान संपन्न झाली. जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रावर चुरशीने मतदान झाल्यावर आमदार सतेज पाटील यांनी माध्य़मांना प्रतिक्रिया दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले, “छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कार्यक्षेत्रातील सर्व गावातील सभासदांनी अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद परिवर्तन पॅनेल दिलेला आहे. गेले दोन महिन्याहून अधिक काळ या रणधुमाळीमध्ये जिल्ह्यातील माझे सर्व सहकारी कार्यकर्ते, मिशन राजारामची टीम आणि अन्य सर्वांनी रात्रंदिवस या निवडणुकीसाठी कष्ट घेतले. सर्वांनी अगदी जीवाचे रान करून परिश्रम घेतले. हा कारखाना सभासदांच्या मालकीचा व्हावा, यासाठी काम केलेल्या हजारो हातांचे आणि सभासदांचे मी मनस्वी आभार मानतो. सभासदांच्या उत्साही प्रतिसादाबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद.” असे प्रतिक्रिया देऊन त्यांनी सभासदांचे आभार मानले.