जम्मू-काश्मीरमध्ये पाऊस अन् भूस्खलन ः राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प
@ वृत्तसंस्था / शिमला
हिमाचल प्रदेशच्या अनेक भागांमध्ये सातत्याने हिमवृष्टी होत आहे. यामुळे 4 राष्ट्रीय महामार्गांसह 176 रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. मागील 24 तासांत राज्यातील 470 वीज आणि 10 पाणीपुरवठा प्रकल्प ठप्प झाले आहेत. हवामान विभागाने पर्वतीय तसेच मैदानी भागांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे.
तर दुसरीकडे जम्मू-काश्मीरमध्ये पाऊस आणि भूस्खलनामुळे काश्मीर खोऱयाला देशाच्या उर्वरित हिस्स्यांशी जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकवरील वाहतूक ठप्प झाली आहे. भूस्खलनातंर महामार्गावर शेकडो वाहने अडकून पडली आहेत.