थकबाकीसाठी 36 ग्राम पंचायतींचे तोडले कनेक्शन : काही ग्राम पंचायती निधी असूनही चालढकल करत असल्याने कारवाई
प्रतिनिधी /बेळगाव
वीजबिल थकविलेल्या बेळगाव तालुक्मयातील ग्राम पंचायतींना हेस्कॉमने दणका दिला आहे. वारंवार सूचना करूनदेखील बिल भरण्यासाठी चालढकल करणाऱया 36 ग्रा. पं. वर कारवाई करण्यात आली आहे. संबंधित ग्रा. पं. चे विद्युत कनेक्शन तोडण्यात आले असून ग्रा. पं. ना अंधारात कारभार करावा लागणार आहे.
ग्राम पंचायतींना 15 व्या वित्त आयोगातून विद्युतबिल भरण्यासाठी निधी दिला जातो. ग्राम पंचायत हद्दीतील पथदीप, पाणीपुरवठा व ग्राम पंचायत कार्यालयासाठी वीजपुरवठा केला जातो. बेळगाव तालुक्मयातील अनेक ग्राम पंचायतींचे कोटय़वधी रुपयांचे बिल थकीत आहे. चार महिन्यांपूर्वी अशाच पद्धतीने कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर तात्पुरत्या स्वरुपात काही ग्राम पंचायतींनी थोडीफार रक्कम भरली. मिळणाऱया निधीपेक्षा विजेचा खर्च अधिक असल्यामुळे थकीत बिलाची रक्कम प्रत्येक महिन्याला वाढत चालली आहे.
ग्रामीण उपविभाग 1 (पश्चिम भाग) यामध्ये येणाऱया 32 ग्राम पंचायतींचा वीजपुरवठा मंगळवारी सकाळी तोडण्यात आला. त्याचबरोबर ग्रामीण उपविभाग 2 (पूर्वभाग) अंतर्गत येणाऱया 5 ग्राम पंचायतींचा वीजपुरवठा शनिवारी तोडण्यात आला होता. तर आणखी 2 ग्राम पंचायतींचे कनेक्शन बुधवारी सकाळी तोडण्यात येणार आहे. थकबाकी वाढत असून याचा परिणाम हेस्कॉमच्या महसुलावर होत आहे. काही ग्राम पंचायती निधी असूनही चालढकल करत असल्याने कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
ग्राम पंचायतींना वेळोवेळी नोटिसा पाठविल्या होत्या
बेळगाव तालुक्मयातील अनेक ग्राम पंचायतींचे विद्युतबिल थकले आहे. संबंधित ग्राम पंचायतींना वेळोवेळी नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. परंतु त्यांनी वेळेत बिल न भरल्याने अखेर काही ग्राम पंचायतींचे कनेक्शन तोडण्यात आले आहे.
– प्रवीणकुमार चिकाडे (कार्यकारी अभियंते, बेळगाव तालुका)
थकबाकी असलेल्या ग्राम पंचायती-
ग्राम पंचायत | थकबाकी | ग्राम पंचायत | थकबाकी |
बेनकनहळ्ळी | 1 कोटी 5 लाख | निलजी | 27.76 लाख |
आंबेवाडी | 22 लाख 90 हजार | कंग्राळी बी. के. | 18 लाख |
हिंडलगा | 81 लाख 58 हजार | काकती | 1 कोटी 9 लाख |
बंबरगा | 26 लाख | सुळेभावी | 2 कोटी 10 लाख |
कडोली | 53 लाख | बाळेकुंद्री बी.के. | 7 लाख |
काकती | 8 लाख | मारिहाळ | 15 लाख |
सुळगा | 13 लाख | हिरेबागेवाडी | 62 लाख |
धामणे | 10 लाख | मार्कंडेयनगर | 76 लाख |
देसूर | 2 लाख | होनगा | 92 लाख |
बिजगर्णी | 7 लाख | हंदिगनूर | 10 लाख |
न्यू वंटमुरी | 54 लाख | संतिबस्तवाड | 45 लाख |
किणये | 53 लाख | बेळगुंदी | 1 लाख 41 हजार |
अगसगा | 1 लाख 5 हजार | येळ्ळूर | 3 लाख |