► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात प्रदीर्घ काळ आंदोलन केलेले कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांना आशियायी क्रिडा स्पर्धांमध्ये थेट प्रवेश देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयात हस्तक्षेप करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने शनिवारी नकार दिला. या ज्येष्ठ कुस्तीपटूंना चाचणी स्पर्धांमध्ये भाग घेऊन पात्रता सिद्ध न करताच थेट प्रवेश देण्याच्या निर्णयाच्या विरोधात काही कुस्तीपटूंनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका सादर केली होती. इतर खेळाडूंप्रमाणे या ज्येष्ठ खेळाडूंनाही चाचणी स्पर्धेत भाग घेण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. मात्र, ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने शनिवारी नाकारली आहे.