मुंबई
जागतिक पातळीवरील एफएमसीजी क्षेत्रातील दिग्गज कंपनी हिंदुस्थान युनिलिव्हर (एचयूएल) कंपनीला ऑक्टोबर-डिसेंबर 2022 या तिसऱया तिमाहीत 12 टक्के निव्वळ नफा मिळाला आहे. जो वधारुन 2,505 करोड रुपयाच्या घरात पोहोचला आहे. निव्वळ विक्रीत कंपनीने 16 टक्क्यांची वाढीची कामगिरी नोंदवली आहे. कंपनीने मागील वर्षाच्या समान कालावधीत 2,243 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. 15 हजार 343 कोटी रुपयांचा एकंदर महसूल वरील अवधीत कंपनीने प्राप्त केला असून जो मागच्या वर्षाच्या तिमाहीपेक्षा 16 टक्के अधिक आहे.
व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करा
हिंदुस्थान युनिलिव्हरचे मुख्य कार्यकारी आणि एमडी संजीव मेहता यांनी सांगितले की, ग्रामीण भागात मागच्या तिमाहीत ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या मागणीत लक्षणीय वाढ दिसली आहे. ज्याचा परिणाम नफा व महसूल वाढीत दिसला आहे. आगामी काळातही या क्षेत्राला चांगली कामगिरी करता येईल, अशी आशा
आहे.