बेळगाव : एका कर्जबाजारी शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना होनिहाळ, ता. बेळगाव येथे घडली. मारिहाळ पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत. महांतेश रायाप्पा केंगेरी (वय 45), रा. होनिहाळ असे त्या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्याने वेगवेगळ्या सोसायटी व बँकांतून कृषी कर्ज घेतले होते. कर्जाचे ओझे वाढले. पीक व्यवस्थित आले नाही. त्यामुळे कर्जाची परतफेड करता आली नाही. य् ााच मनस्तापातून शुक्रवार दि. 24 फेब्रुवारी रोजी त्याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला अत्यवस्थ अवस्थेत उपचारासाठी खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. उपचारांचा उपयोग न होता रविवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून महांतेशचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मारिहाळ पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून शेतकऱ्याच्या आत्महत्या प्रकरणाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर तिगडी पुढील तपास करीत आहेत.
Previous Articleरोड शो मार्गावरील धोकादायक बसथांब्याकडे दुर्लक्ष
Next Article दलित संघर्ष समितीचे रेल्वेस्थानकात आंदोलन
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.