प्रतिनिधी /बेळगाव
येथील कॅथॉलिक असोसिएशनतर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षेत 90 टक्क्मयांहून अधिक गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. रविवारी कॅम्प येथे सेंट ऍन्थनी शाळेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात डायोसीसचे बिशप डेरेक फर्नांडिस, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक वॉल्टर डीमेलो जेटी उपस्थित होते. मुलांवर जीवन कौशल्ये आणि चांगली नैतिक मूल्ये विकसित करण्याची प्रेरणा त्यांनी दिली.
यावेळी दहावी परीक्षेत अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या 9 व बारावी परीक्षेतील 8 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. व्हिकार जनरल फादर फिलीप कुट्टी, फादर ऍलेक्स डिपूझ, सेंट जोसेफ हायस्कूलच्या प्रा. मेरी अब्राहम, कॅथॉलिक असोसिएशनच्या श्रीमती क्लासा फर्नांडिस, उद्योगपती कीथ मचाडो आणि जॉन अल्वारेझ यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील उत्कृष्ट प्रयत्नांसाठी प्रेरित केले.