Kolhapur Crime News : राधानगरी तालुक्यातील तरसंबळे येथे भरदिवसा घराचा मागील बाजूचा बंद दरवाजा मोडून चोरट्याने दोन लाख छप्पन हजार रुपयांचा मुद्देमालासह ऐवज लंपास केला. घराचा पाठी मागील बायसनचा दरवाजा फोडून चोरट्याने आत प्रवेश केला होता.घरातील लोक कुलूप लावून बाहेर गेल्यानंतर चोरट्याने भरदुपारी घरफोडी केल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे. दरम्यान घटनास्थळी श्वानपथकही दाखल झाले आहे.
तरसंबळे येथील एकनाथ केशव पाटील हे तरसंबळे ग्रामपंचायतिच्या ग्रामसभेसाठी गेले होते तर त्यांची पत्नी गावातील अंगणवाडीमध्ये कामावर आहे.त्या अंगणवाडीमध्ये गेल्या होत्या दरम्यान चोरट्याने पाटील यांच्या घराचा मागील बायसनचा दरवाजा फोडून आतमध्ये घुसून खोलीतील तिजोरीचा दरवाजा उचकटून पंधरा हजार रुपये रोख रक्कम ,व सोनेचांदीच्या ऐवजासह असा एकूण दोन लाख छप्पन हजारांचा मुद्देमाल लंपास केला.ही घटना मंगळवारी दुपारी घडली.घटनास्थळी श्वानपथक दाखल झाले परंतु श्वान परिसरात घुटमळले.अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कोळी,पोलीस उपनिरीक्षक घेरडीकर करत आहेत.