सर्वत्र भव्य स्वागत-पाठिंब्याने मिळाली बळकटी : एकजुटीने विजयी करण्याचा नागरिकांचा निर्धार
बेळगाव : दक्षिण मतदारसंघातील म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांची टिळकवाडी भागामध्ये शुक्रवारी प्रचारफेरी काढण्यात आली. या प्रचारफेरीला सर्वत्र भरभरून पाठिंबा मिळाला. अक्षरश: घरातून बाहेर येवून त्यांचे साऱ्यांनीच स्वागत केले. एकजुटीने विजयी करण्याचा निर्धार टिळकवाडी परिसरातील विविध युवक मंडळांनी, महिला मंडळांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी केला आहे. गणेश मंदिर येथे पूजा करून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत बसवेश्वर, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, संत साईनाथ महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन रमाकांत कोंडुस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रचारफेरीला सुरुवात झाली. प्रचारफेरीवेळी विविध भागांमध्ये त्यांचे उत्साही स्वागत करण्यात आले. विविध ठिकाणी फलक हातात घेऊन आपले विचार व्यक्त करण्यात आले.
य् ाावेळी शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध आवाज उठवला. त्यामुळे सर्व विभागात मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शविण्यात आला. गणेशोत्सव मंडळ, विविध युवक मंडळांनी बिनशर्थ पाठिंबा दर्शविला. सोमवारपेठ, मंगळवारपेठ, बुधवारपेठ, गुरुवारपेठ, शुक्रवारपेठ, शनिवारपेठ, गवळी गल्ली, साईबाबा मंदिर, टिळकवाडी, इंद्रप्रस्थनगर, मराठा कॉलनी, ईस्कॉन मंदिर येथे प्रचाराची सांगता झाली. य् ाावेळी उद्योजक आनंदराव गोगटे, माजी महापौर अॅड. नागेश सातेरी, कला सातेरी, अॅड. अजय सातेरी, अॅड. सांबरेकर, माजी प्रा. आनंद मेणसे, श्रीधर अळवणी, श्रीधर पाटील, माजी नगरसेवक अनिल पाटील, गोपाळ कुकडोळकर, भारत पाटील, किरण गवळी, रवी गवळी, अनिल भवानी, सुनील बोकडे, राजू बिर्जे, प्रकाश शिरोळकर, सचिन पाटील, मोहन पाटील, प्रभाकर पाटील, बी. ओ. येतोजी, माजी महापौर किरण सायनाक, माजी नगरसेवक राकेश पलंगे, संभाजी चव्हाण, मोहन भांदुर्गे, दिलीप बर्डे, प्रभाकर कुरळे, माजी महापौर संजय शिंदे, नारायण पाटील, सागर गुंजीकर, भारत नागरोळे, रोहन पाटील, निखिल भातकांडे, सुधीर लोहार, प्रभाकर अष्टेकर, उमेश पाटील, उदय पाटील, सागर पाटील, अमित पाटील, सुनील मादार, सचिन पाटील, चंद्रकांत कोंडुस्कर, नारायण कोंडुस्कर, श्रीकांत कुरिहाळकर, माजी महापौर आप्पासाहेब पुजारी, रवी गोडसे, विजय चौगुले, प्रवीण कोराने, शरद कोराने, नितीन चौगुले, आशिष कुरणकर, प्रथमेश कुरणकर, संतोष पोटे यांच्यासह समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनगोळमध्ये आज पदयात्रा-जाहीरसभा
म. ए. समितीचे दक्षिण मतदारसंघातील अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांच्या पदयात्रा व सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. सर्वत्र पदयात्रांना प्रतिसाद मिळत आहे. आता शनिवार दि. 6 मे रोजी अनगोळ येथे पदयात्रा आणि जाहीरसभेचे आयोजन करण्यात आले आहे. म. ए. समितीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनगोळ भागातील सर्वच प्रभागांमध्ये रमाकांत कोंडुस्कर यांना पाठिंबा आहे. त्यांना उमेदवारी मिळताच अनगोळमध्ये एकच जल्लोष करण्यात आला होता. आता कोणत्याही परिस्थितीत त्यांना विजयी करण्याचा निर्धार अनगोळवासियांनी केला आहे. दुपारी 3.30 वाजता अनगोळ नाका येथून पदयात्रेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर अनगोळ रोड येथून हाजुगेरी, विद्यानगर, मरगाई मंदिर, अनगोळ रोडमार्ग, वाजंत्री गल्ली, राजहंस गल्ली, झेरे गल्ली, लोहार गल्ली, सुभाष गल्ली, मारुती गल्ली, कलमेश्वर मंदिर मार्ग, हनमण्णावर गल्ली, जय महाराष्ट्र चौक, भांदूर गल्ली, नाथ पै नगर, बडमंजीनगर, बाबले गल्ली, दत्त मंदिर, त्यानंतर चौथा गेट, गणपती मंदिर, झटपट कॉलनी, शिवशक्तीनगर, रघुनाथपेठ येथून धर्मवीर संभाजी चौक येथे जाहीर सभेत रुपांतर होणार आहे. या पदयात्रा आणि जाहीरसभेत आजी-माजी लोकप्रतिनिधी, पंचमंडळी, युवक मंडळे, महिला मंडळांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आज सकाळी मराठा मंदिर, गोकुळनगर परिसरात पदयात्रा
शनिवारी सकाळी 7 वाजता मराठा मंदिर येथून पदयात्रेला सुरुवात होणार आहे. न्यू गुडस्शेड रोडमार्गे गोकुळनगर, गोडसेनगर या परिसरात प्रचारफेरी काढण्यात येणार आहे. तरी सकाळी सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.