केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांच्या नविन I.N.D.I.A. आघाडीवर जोरदार निशाणा साधला. DMK नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी हिंदू- सनातन धर्मावर केलेल्या टिपण्णीचा संदर्भ देत नविन विरोधी आघाडी ‘हिंदू धर्माचा द्वेष करत’ असल्याचे म्हटले आहे. ते राजस्थानमध्ये डुंगरपूर येथील सभेला संबोधित करताना बोलत होते.
सनातन धर्माची तुलना डेंग्यू, मलेरिया यासारख्या इतर आजारांशी करताना ‘आपल्याला त्यांचा नायनाट करायचा आहे’ असे विधान उदयनिधी स्टॅलिनची तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आणि मंत्री उदयनिधी स्टॅलीन यांनी विधान केले होते. सनातनला केवळ विरोध करण्यापेक्षा ते नष्टच केले पाहिजे असेही त्यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटले होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले, “विरोधकांना सत्ता हवी आहे पण कशासाठी? तुम्ही सनातन धर्म आणि या देशाच्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा अनादर करत आहात. एका (माजी) केंद्रीय अर्थमंत्री आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची मुले सनातन धर्म संपवण्याचा दावा करत आहेत. तुम्ही सनातन धर्म संपवायला तयार आहात का? उदयनिधी स्टॅलिनची यांनी केलेली टिप्पणी ही I.N.D.I.A.चा एक भाग आहे. या आघाडीचे ‘व्होट बँकेचे राजकारण’ आणि ‘तुष्टीकरणाची खेळी’ करायची आहे. असे ते म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या विधानाची आठवण करून देत केंद्रीय बजेटवरील पहिला अधिकार अल्पसंख्याकांचा आहे असल्याचे म्हटले होते. “व्होट बँकेच्या लालसेपोटी काँग्रेसने अर्थसंकल्पातील अधिकार अल्पसंख्याकांना दिले,” असेही त्यांनी सांगितले.