यरगट्टी-गोकाक रोडवर एकाला अटक
बेळगाव : यरगट्टी-गोकाक राज्य महामार्गावर अबकारी विभागाने मारुती अल्टोमधून बेकायदा दारूसाठा जप्त केला आहे. कारसह 4 लाखाचा दारूसाठा जप्त करण्यात आल्याची माहिती अबकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे. कारमधून बेकायदा दारू वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच कार अडवून तपासणी केली असता 2 हजार 400 टेट्रा पॅक असलेले 25 बॉक्स कारमध्ये आढळले. 216 लिटर मद्यसाठा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत 84 हजार 312 इतकी होते. तर जप्त कारची किंमत 3 लाख रुपयांइतकी होते. रामदुर्ग येथील अबकारी कार्यालयात या प्रकरणाची नोंद झाली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.