बेळगाव / प्रतिनिधी
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे रविवार दि. 11 रोजी महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 4 वाजता अनसुरकर गल्ली येथील छत्रे वाडय़ात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजीराव भिडे गुरुजी यावेळी धारकऱयांना मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीला शहर तसेच ग्रामीण भागातील गावप्रमुख, गल्लीप्रमुख व विभाग प्रमुखांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख किरण गावडे यांनी केले आहे.