समाजवादी पक्षाला दिली सोडचिठ्ठी
वृत्तसंस्था /लखनौ
उत्तरप्रदेशच्या राजकारणात चर्चेत असणारे नेते इमरान मसूद आता मायावती यांच्या पक्षात सामील झाले आहेत. उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी समाजवादी पक्षात प्रवेश करणारे इमरान मसूद हे त्यापूर्वी काँग्रेस पक्षात कार्यरत होते. सहारनपूरमधील स्थानिक निवडणुकीपूर्वी घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसचे पक्षाचे मातब्बर नेते असलेले इमरान हे विधानसभा निवडणुकीपूर्वी अखिलेश यादव यांच्यासोबत गेले होते. इमरान यांनी आता पुन्हा पक्षांतर करून बसपमध्ये प्रवेश केला आहे. बसप प्रमुख मायावती यांची भेट घेतल्यावर इमरान यांनी बसपमध्ये प्रवेश केल्याची अधिकृत घोषणा केली आहे. समाजवादी पक्षात सन्मान मिळत नव्हता असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. मुस्लिमांनी समाजवादी पक्षाला एकगठ्ठा मतदान केले तरीही सरकार स्थापन करता आलेले नाही, अशा स्थिती राज्यात भाजपला केवळ बसपच पर्याय ठरू शकतो असे मसूद यांनी नमूद केले आहे.