राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा
बेळगाव : बेळगाव जिल्हा आयोजित विद्याभारती राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत उद्घाटनच्या दिवशी बेळगांव, मंगळूर, बेंगलोर संघानी आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. माळमारुती येथील लव्हडेल स्कुल मैदानावर या स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव अमित पाटील, संत मीरा माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष प्रकाश पुजारी, तुषार ताशीलदार, ओमकार देसाई, परमेश्वर हेगडे, सुजाता दप्तरदार, माधव पुणेकर, रामनाथ नाईक, राघवेंद्र कुलकर्णी, सी.आर. पाटील या मान्यवरांच्या हस्ते ओंकार, सरस्वती, भारत माता फोटो पूजन, दीपप्रज्वलन व खेळाडूंची ओळख करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी पंच विजय रेडेकर, कौशिक पाटील, योगेश सांवगावकर, यश पाटील, शिवकुमार सुतार, बसवंत पाटील, मयुरी पिंगट, भारती बाळेकुंद्री आधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेमा मेलीनमनी तर आभार सरोजा कटगेरी यांनी आभार मानले. प्राथमिक मुलांच्या गटातील पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बेंगलोरने धारवाडचा 2-0 असा पराभव केला तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बेळगांवने मंगळूरचा 3-0 असा पराभव केला, माध्यमिक मुलांच्या गटात बेंगळूरने धारवाडचा 1-0 असा पराभव केला, तर बेळगांवने मंगळूरचा 1-0 असा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.