रत्नागिरी / प्रतिनिधी
रत्नागिरी शहरातील टिळक आळी येथील दुकानाच्या ड्रॉव्हरमधून अज्ञाताने रोख 18 हजार रुपये लांबवले.याबाबत गणेश अशोक रानडे (40,रा.विश्वेश्वर अपार्टमेंट टिळक आळी, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यानुसार, त्यांचे टिळक आळी येथील विक्रम प्रसाद आर्केडमध्ये श्रीरंग एन्टरप्राझेस नावाचे जनरल स्टोअर आहे. बुधवारी दुपारी पांढर्या रंगाचे हाफ शर्ट व पांढर्या रंगाची फूल पॅन्ट कोरीव दाढी असलेला एक तरुण त्यांच्या दुकानात आला होता.त्याने कोणाचेही लक्ष नाही असे पाहून त्यांच्या दुकानातील काउंटरच्या ड्रॉव्हरमधून रोख 18 हजार रुपये चोरुन नेले. काहीवेळाने ही बाब रानडे यांच्या लक्षात येताच त्यांनी दुकानाबाहेर आणि आजुबाजुला त्या तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु तो मिळून आला नाही.अखेर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.याप्रकरणी अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.