ॲड. विक्रम भांगले यांच्या हस्ते उद्घाटन
वेंगुर्ले (वार्ताहर)-
उपरकर शूटिंग अँकॅडमी,कॅम्प, वेंगुर्ला येथे बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला आयोजित मुंबई विद्यापीठ (कोकण झोन 4) च्या नेमबाजी स्पर्धांचा शुभारंभ ॲड. विक्रम भांगले यांच्या शुभहस्ते करण्यात आला. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. आनंद बांदेकर उपस्थित होते तर या स्पर्धेचे उद्घाटन ॲड. विक्रम भांगले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. प्राचार्य बांदेकर यांनी श्री.भांगले यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. भांगले यांनी सहभागी झालेल्या नेमबाजांना मार्गदर्शन केले व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. प्रा. बांदेकर यांनी उपरकर शूटिंग अकॅडमीच्या माध्यमातून याहूनही मोठ्या स्पर्धा वेंगुर्ला येथे आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला.या स्पर्धेमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या नेमबाजांनी सहभाग घेतला.
याप्रसंगी उपकर शूटिंग अकॅडमीचे प्रशिक्षक श्री कांचन उपरकर, क्रीडा संचालक प्रा. जयसिंग नाईक, जिमखाना चेअरमन प्रा. कमलेश कांबळे, प्रा. डी आर आरोलकर, प्रा. चंद्रकांत नाईक सावंतवाडी सचिव (कोकण झोन 4), दादासाहेब पवार, दीपक सावंत, सुदेश आंगचेकर, कु. सानिया आंगचेकर आदी उपस्थित होते.