प्रतिनिधी/ बेळगाव
रोटरॅक्ट क्लब ऑफ बेळगावचा 50 वा अधिकारग्रहण समारंभ शनिवार दि. 23 रोजी सँटोरिनी कॅफे येथे पार पडला. इन्स्टॉलिंग ऑफिसर आणि प्रमुख पाहुणे म्हणून डीआरआर अनिकेत जाधव उपस्थित होते. जानवी भद्र यांना 2022-23 चे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले.
याचबरोबर सचिव म्हणून प्रेरणा जांभळे, खजिनदार म्हणून कृष्णा अगरवाल आणि इतर सदस्यांना शपथ देण्यात आली. रोटरी क्लब ऑफ बेळगावचे नियुक्त अध्यक्ष जयदीप सिद्दण्णावर, अक्षय कुलकर्णी, मनीषा हेरेकर आदी कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी जयदीप सिद्दण्णावर यांनी समाजाभिमुख कार्य करण्याचे आवाहन रोटरॅक्ट सदस्यांना केले. या कार्यक्रमाला निखील चिंडक आणि इतर अधिकारी उपस्थित होते.