वार्ताहर /कडोली
चलवेनहट्टी येथील जागृत व पुरातन ग्रामदैवत श्री ब्रह्मलिंग मंदिराचा वास्तूशांती, मूर्तीप्रतिष्ठापना, कळसारोहण व उद्घाटन सोहळा नुकताच झाला. पूज्यश्री शिवसिद्धसोमेश्वर महास्वामीजी मुक्तीमठ, पूज्यश्री गुऊबसवलिंग महास्वामीजी कडोली यांचे सान्निध्य व मार्गदर्शनाखाली वेदशास्त्र भूषण जोशी व सहकाऱ्यांच्या पौरोहित्याखाली मंत्रघोष झाला. सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम थाटामाटात पार पडले. तत्पूर्वी मंदिर परिसर साफसफाईसह भव्य मंडप उभारून उजळला होता. संपूर्ण कार्यक्रम ड्रोन पॅमेरात कैद करून स्क्रीनवर लाईव्ह प्रक्षेपणही केले. देवस्थान जीर्णोद्धार कमिटीचे सर्व पदाधिकारी, युवक, महिला मंडळांसह सर्व संघ-संस्था, ग्रामस्थ, दानशूर व्यक्ती, माहेरवाशिणी व पंचक्रोशीतील भाविक सहभागी झाले होते. पहिल्यादिवशी मनोहर पाटील, शांताराम अलगोंडी यांच्या हस्ते पूजनाने कळस मिरवणुकीला चालना देण्यात आली. गावभर ढोल-ताशांच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली. दुसऱ्या दिवशी जीवन विद्या मिशनतर्फे शंकर बांदकर (सिंधुदुर्ग, देवगड) यांच्यातर्फे ‘सुखी जीवनाची गुऊकिल्ली’ यावर संध्याकाळी 6 ते 8 यावेळेत प्रवचन झाले. रात्री हिरामणी मुंचडीकर यांचे हिंदुत्व जागृतीवर व्याख्यान झाले.
गोमाता पूजन, वास्तूशांती व जुन्या मंदिरातून नूतन मंदिरात सवाद्य मिरवणुकीने देवमूर्तींचे स्थलांतर, होमहवन, वास्तूशांती व सत्यनारायण पूजेचे मानकरी अशोक पाटील दाम्पत्य होते. दुपारी 4 ते 6 वा. कलमेश्वर महिला हरिपाठ कालकुंद्री, रात्री 8 ते 10 यावेळेत ‘जीवन सुंदर आहे’ आधारित गणेश शिंदे (पुणे) यांचे व्याख्यान तर रात्री 11 वा. सर्व भजनी मंडळ चलवेनहट्टी यांचे जागर भजन झाले. गुरुवारी सकाळी 12 वा. पूज्य गुऊबसवलिंग स्वामीजी कडोली यांच्या सान्निध्यात आणि प्रमुख पाहुणे क्लास वन काँट्रॅक्टर मण्णूरचे एन. एस. चौगुले यांच्या हस्ते मुख्य कळस तर पूर्वेकडील जोतिबा बडवाण्णाचे, पश्चिमेकडील निवृत्त सैनिक राहुल पाटील, दक्षिणेकडील डॉ. युवराज पाटील व उत्तरेकडील कळस पूजन किरण पाटील यांच्या हस्ते झाले. सायं. 4 ते 6 यावेळेत माउली महिला हरिपाठ अतिवाड तर रात्री 8 ते 10 आदिनाथ डवरी मेतके ता. कागल यांचे नाथपंथी जागर झाले. शेवटच्या दिवशी अशोक पाटील यांच्यातर्फे सत्यनारायण पूजा तर मंदिर कमिटी उपखजिनदार व ग्रा. पं. माजी सदस्य माऊती पाटील, नारायण पाटील, लक्ष्मण बडवाण्णाचे, बाबू पाटील यांच्या हस्ते गाभाऱ्याचे पूजन करून मंदिर लोकार्पण झाले. अर्जुन बडवाण्णाचे व भरमा पाटील यांच्या हस्ते महाप्रसादाला सुऊवात झाली. एन. एस. चौगुले, सुनील पाटील, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, संजय पाटील, नागराज एच., परशराम बडवाण्णाचे, कृष्णा पाटील, मंजुनाथ ठोसर, भरमाण्णा पाटील, मल्लाप्पा हुंदरे, चंद्रकांत पाटील, इराप्पा कलखांबकर, अध्यक्ष मल्लाप्पा बडवाण्णाचे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन मनोहर हुंदरे यांनी केले. प्रास्ताविक लक्ष्मण बडवाण्णाचे तर भरमा अलगोंडी यांनी आभार मानले.