बेळगाव : केएलई आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि लोककल्प फाउंडेशनच्या सहकार्याने चिगुळे गावात आरोग्य शिबिर घेण्यात आले. हे शिबिर लोककल्प फाउंडेशनच्या ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्याच्या उपक्रमाचा एक भाग होता. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.चे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली 32 गावे दत्तक घेतली आहेत, त्यापैकी चिगुळे एक आहे. या शिबिरामध्ये निदानासोबतच ऊग्णांना मोफत आयुर्वेदिक औषधेही देण्यात आली. आरोग्यदायी जीवनशैली आणि आहाराचे पालन करण्याचे महत्त्व तसेच आयुर्वेदाचा त्यांच्या दैनंदिन दिनचर्येत समावेश करण्याचे फायदे याविषयी डॉक्टरांनी ऊग्णांना सल्ला दिला. गावकऱ्यांच्या सक्रिय सहभागाने हा कार्यक्रम यशस्वी झाला. केएलईच्या टीममध्ये डॉ. रोहन मोहनदास, डॉ. मोहित शर्मा, डॉ. बालाजी, डॉ. सना, श्रीधर के. आणि नारायण उपस्थित होते. लोककल्प फाउंडेशनचे कर्मचारी सूरजसिंग राजपूत, प्रसाद असुकर, प्रितेश पोटेकर आणि स्वयंसेवक संतोष कदम, सुहासिनी पेडणेकर, अनंत गावडे यांच्यासह गावातील अनेक लोक उपस्थित होते.
Previous Articleचलवेनहट्टीत श्री ब्रह्मलिंग मंदिराचा उद्घाटन सोहळा
Next Article बेळगाव जिल्ह्यात 39 लाख 67 हजार 574 मतदार
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.