Inauguration of Dashavatar Drama Competition by Archana Ghare in Kunkeri
दशावतारी कला ही कोकणचा अनमोल ठेवा असून ही कला नाट्य महोत्सवाच्या माध्यमातून जोपासण्याचा मंडळाचा हा स्थ्युत्य उपक्रम आहे. तसेच गावाचे एकजूट ठेवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. अशा सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांसाठी मंडळाला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे परब यांनी दिली.
कुणकेरी क्रीडा आणि कला विकास मंडळाच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय निमंत्रित दशावतार नाट्य स्पर्धेच्या उद्द्घाटन प्रसंगी अर्चना घारे परब बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर कुणकेरी सरपंच सोनिया सावंत, दत्ताराम परब देवस्थान कमिटी अध्यक्ष महादेव गावडे, सोसायटी चेअरमन नामदेव नाईक, पोलीस पाटील तानाजी सावंत, ग्रामपंचायत सदस्य अंकिता सावंत, अनुराधा गावडे, आत्मेश सावंत, स्पर्धेचे परीक्षक भास्कर सामंत (कणकवली) मोहन मेस्त्री (कुडाळ), गोपाळ गावडे, झीलू परब, कृष्णा मेस्त्री, अभिजीत सावंत, परेश सावंत, नामदेव सावंत, रणजीत मराठे, मंडळाचे अध्यक्ष भरत सावंत, उपाध्यक्ष नीता सावंत, चावडेकर मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
ओटवणे प्रतिनिधी