प्रतिनिधी
बांदा
पतंजली योग समिती सिंधुदुर्ग मार्फत पत्रादेवी येथे आज दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी श्री ब्राम्हण मंदिर, पत्रादेवी, तोरसे येथे संयुक्त योगोपचार शिबिर चालू करण्यात आले. या शिबिराचे पतंजली योगसमिती सिंधुदुर्ग चे सहजिल्हा प्रभारी श्री शेखर बांदेकर हे उद्घाटक म्हणून लाभले . त्यावेळी माजी पंचायत समिती सदस्य सावंतवाडी सौ राखी कळंगुटकर , माजी सरपंच श्री बित्रो डिसोझा , श्री रमेश सावळ , श्री अशोक सावळ, सौ स्नेहा नाईक , सौ प्रणाली सावळ आदी उपस्थित होते. दीप प्रज्वलनाने उद्घाटन झाल्यानंतर योग वर्ग घेण्यात आला. सूक्ष्म व्यायाम, सूर्यनमस्कार, योगासन, प्राणायाम असा अभ्यास केला गेला. शिबीर संपल्यानंतर देखील नियमित योगवर्ग चालू राहील, तसेच निरंतर योगाभ्यास करणे ही काळाची गरज आहे त्यामुळे सर्व जनतेने या योगशिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन उद्घाटक श्री शेखर बांदेकर यांनी केले.