एसकेई सोसायटी-लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी प्रायोजक
प्रतिनिधी / बेळगाव
एसकेई सोसायटीच्या जीएसएस पदवीपूर्व महाविद्यालय आणि लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या देशभक्तिगीत गायन स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी झाले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून एसकेई सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकुर, उपाध्यक्ष एस. वाय. प्रभू, ज्ञानेश कलघटगी, विनायक जाधव, प्राचार्य प्रणव पित्रे, संस्कृती संघाच्या अध्यक्षा भारती सावंत, विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष प्रा. अनिल खांडेकर व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रा. प्रणव पित्रे यांनी स्वागत केले. गेले महिनाभर कॉलेज परिसरात ‘आजादी का अमृतमहोत्सव’निमित्त अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. किरण ठाकुर व एस. वाय. प्रभू यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाषा विभागाच्या प्रा. जयश्री कंग्राळकर, अनघा वैद्य, साक्षी कुलकर्णी, उमा भोजे, प्रज्ञा बांदेकर यांनी केले. आभार प्रा. भारती सावंत यांनी मानले.