बेळगाव- शहरातील बिम्स प्रांगणात बांधण्यात आलेल्या सुसज्ज सुपरमल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या दोन मजल्यांचे काम पूर्ण झाले असून अधिवेशनाच्या शेवटी त्याचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न करू, असे आमदार अनिल बेनके यांनी सांगितले.त्यांनी आज दिनांक 07 डिसेंबर 2022 रोजी बिंम्स प्रांगणात रुग्णालयाच्या कामाचे निरीक्षण केले आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली, ज्यामध्ये अधिवेशनाच्या शेवटी रुग्णालयाचे उद्घाटन होणार आहे. दरम्यान, प्रलंबित कामे पूर्ण करावीत. व त्यावेळी मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल आणि ट्रॉमा सेंटर या दोन्ही प्रकल्पांना चालना देण्यात येणारआहे.मनुष्यबळ आणि साधनसामग्रीच्या कमतरतेमुळे उद्या मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि जिल्हा प्रभारीमंत्री यांची भेट घेऊन याबाबत चर्चा करणारअसल्याचे व्यक्त केले. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की, दोन मजल्यांचे काम नोव्हेंबर महिन्याचे पूर्ण करण्याच्या उद्धिष्ट दिल्याप्रमाणे काम पूर्णत्वास गेले आहे. उपकरणे आणि मनुष्यबळाची कमतरता आहे, त्यामुळे आरोग्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. उपकरणांशिवाय रुग्णालयाचे उद्घाटन करणे योग्य नाही, त्यामुळे संबंधितांशी चर्चा करू असे ते म्हणाले. यावेळी आमदारांसमवेत बिंम्स संचालक अशोकशेट्टी, बिंम्स चे सी ई ओ शाहिदा आफरीन बानूबल्लारी, जिल्हा शल्यचिकित्सक सुधाकर आर.सी. तसेच इतर उपस्थित होते.
Previous Articleमहाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाच्या अध्यक्षपदी पी.आर पाटील
Related Posts
Add A Comment