अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मागणीला यश
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गोवा ने बी.ई. अभियांत्रिकी अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या डण् 19-20़ सलग दोन पेपरमधील अभ्यासाचे अंतर वाढवण्याची केलेली विनंती गोवा विद्यापीठाने यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.
10 रोजी अ.भा.वि.प ने गोवा विद्यापीठाच्या कुलसचिवांना पत्र सादर केले होते, ज्यामध्ये बी.ई. च्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या सलग दोन पेपरमधील अंतर वाढवण्यासाठी मागणी होती. विद्यार्थी परिषद च्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून गोवा विद्यापीठाने 18 जानेवारी 2023 ते 23 जानेवारी 2023 रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 12.30 या वेळेत पेपर पुन्हा शेड्यूल केला आहे.
यावेळी विद्यार्थी आमच्याकडे आपली समस्या घेऊन आले आणि त्वरीत यावर आम्ही कुलसचिवकडे त्याची मांगणी केली, असे गोवा संयोजक धनश्री मांद्रेकर म्हणाल्या. विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि ते अ.भा.वि.प म्हणूण सतत करत आलो आहे, असे उत्तर गोवा जिल्हा संयोजक सुदिप नाईक म्हणाले. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना सोयीचे होऊन गेले आहे, विद्यार्थ्यांनी योग्य वेळी आम्हाला संपर्क साधला त्यामुळे त्वरीत आम्ही मागणी करून विद्यार्थ्यांची समस्या सोडवली, असे दक्षिण गोवा जिल्हा संयोजक पवनराज सावंत यांनी सांगितले.