प्रतिनिधी /मोरजी
पेडणे तालुका ही कलाकारांची खाण म्हणून प्रसिद्ध आहे आणि या भूमीने राज्य पातळीवरच नव्हे तर देश पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कलाकार आहे आणि या कलेचा भूमीत मांदेची सुकन्या साची सावंत हिने आपल्या कलेतून केवळ मांदे गावचे नाव नव्हे तर गोव्याचे नाव देश पातळीवर उज्ज्वल करण्यासाठी योगदान दिलेले आहे, असे प्रतिपादन गोमंतकातील नामवंत नाटय़ दिग्दर्शक अनिल असोलकर यांनी केले. मांदे येथील मिस इंडिया संस्थेतर्फे गौरव सोहळा आयोजित केला होता आणि त्यावेळी ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.
मांदे येथील मिस इंडिया संस्था व मोरजी पंचायतन कला संस्था यांच्या वतीने साची राजेश सावंत हिचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गोमंतकातील नामवंत नाटय़ दिग्दर्शक अनिल असोलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर नाटय़ कलाकार नारायण सावंत सनिल पार्सेकर मोरजी पंचायतन कला संस्थेचे सदस्य अनिश पोके गौरेश आरोलकर, चंद्रकांत म्हामल हे उपस्थित होते. कुमारी साची सावंत लिटल किट नंदिपरी या स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवरती द्वितीय क्रमांक पटकावून पेडणे तालुक्मयाचा तसा गोव्याचा लौकीक देशभरात वाढविला. आई सपना राजेश सावंत यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्देश दिलीप पेडणेकर मोरजी पंचायतन कला संस्थेचे सभासद यांनी केलं.