आराधना योजनेंतर्गत अनुसूचित जाती-जमातीच्या मंदिरांना देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्याची मागणी आमदार अमरेगौडा पाटील यांच्यातर्फे आमदार हूलगेरी डी.एस. यांनी केली.
आजच्या विधानसभेच्या अधिवेशनात आमदार हूलगेरी यांच्या तर्फे डी.एस.आमरेगौडा पाटील यांनी आराधना योजनेंतर्गत अनुसूचित जाती-जमातीच्या मंदिरांना देण्यात येणाऱ्या निधीत वाढ करण्यात यावी. वार्षिक 1 किंवा 3 लाखांऐवजी किमान 25 लाख देण्याची मागणी केली.
यावर धर्मादाय मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या की, या योजनेंतर्गत आधीच किमान निधी मंजूर करण्यात येतो शिवाय, गिरिजन योजनेंतर्गत अनुसूचित जाती-जमातींना अधिक अनुदान मंजूर करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
तसेच गावाचे नाव लिहिण्यात झालेली चूक सुधारण्यासाठी आज अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.