75 टक्के महिला वडिलांचा, 24 टक्के पतीचा व्यवसाय चालवतात ः मोठे उद्योगपतीही मुलींवर अवलंबून
नवी दिल्ली
कौटुंबिक व्यवसाय चालवण्यासाठी मुलगा आवश्यक आहे असे वाटत असेल तर तो विचार आता मागे पडत असल्याचे चित्र आहे. यामध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, बर्नार्ड अरनॉल्ट यांनी घोषणा केली आहे की ते सुमारे 72.4 हजार कोटी रुपयांच्या लक्झरी वस्तूंच्या दुसऱया सर्वात मोठय़ा ब्रँडची जबाबदारी मुलगी डेल्फीन यांच्याकडे सोपवणार आहेत.
1 फेब्रुवारीपासून त्या नवीन पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. बर्नार्ड म्हणाले, ‘लुई व्हिटॉनचे कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून काम करताना डेल्फीनने विक्रीचे नवे विक्रम प्रस्थापित केले.
देशातही अनेक मोठय़ा व्यावसायिक घराण्यांकडून आपल्या मुलींच्या हाती व्यवसाय सोपवला जात आहे. नोएल टाटा यांची मुलगी लीह 2002 पासून ताज ग्रुप ऑफ हॉटेल्सचे व्यवस्थापन बघत आहे. एका 18 वर्षांच्या अभ्यासानुसार देशातील 24 टक्के कौटुंबिक व्यवसाय महिला चालवतात. यापैकी 76टक्के वडील आणि 24 टक्के पती यांचा व्यवसाय सांभाळतात. यातील दिग्गज उद्योगपतींच्या मुलीही वडिलांच्या/पतीच्या व्यवसायात सहभाग घेत असून त्यामधील काही निवडक ब्रँडची माहिती आपण करुन घेणार आहोत.
ईशा अंबानीः रिलायन्स जिओ
ईशा अंबानी 2014 मध्ये रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेलमध्ये सहभागी झाल्या आहेत. जिओ 42.13 कोटी ग्राहकांसह देशातील सर्वात मोठे मोबाइल नेटवर्क बनले आहे. रिलायन्स रिटेल ही जगातील दुसरी सर्वात वेगाने वाढणारी रिटेलर आहे. तिचे लग्न आनंद पिरामल यांच्याशी झाले आहे. ईशाने 19 नोव्हेंबरला जुळ्या मुलांना जन्म दिला.
निसाबा गोदरेजः गोदरेज कंझ्युमर
निसाबा ही गोदरेज ग्रुपचे चेअरमन आदि गोदरेज यांची दुसरी मुलगी आहे. मे 2017 मध्ये वडील आदि गोदरेज कार्यकारी अध्यक्ष झाले. तेव्हापासून गोदरेज कंझ्युमर लिमिटेड दरवर्षी 18 टक्के निव्वळ नफा कमवत आहे. 2015-16 मध्ये 8,305 कोटीचा व्यवसाय होता जो 2021-22 मध्ये वाढून 17,831 कोटी रुपयांवर वाढला. यामध्ये मुलगी निसाबा त्यांना मदत करत असते. निसाबाने रिअल इस्टेट व्यावसायिक कल्पेश मेहतासोबत
लग्न केले.
रोशनी नाडर ः एचसीएलच्या अध्यक्षा
रोशनी नाडर मल्होत्रा ही एचसीएल टेक्नॉलॉजीजचे संस्थापक शिव नाडर यांची मुलगी आहे. 2020 मध्ये, फोर्ब्सच्या जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत ती 55 व्या स्थानावर होती. 20 जुलै रोजी रेशनी नाडर या वडील शिव नाडर यांच्या जागी एचसीएलच्या अध्यक्षा झाल्या. मार्च 2020 मध्ये कंपनीचा निव्वळ नफा 8,969 कोटी रुपये होता.
विनिता गुप्ता ः ल्यूपिनची केली स्थापना
विनिता डी. गुप्ता या देश गुप्ता बंधूंच्या ज्येष्ठ कन्या आहेत, ज्यांनी 1968 मध्ये ल्यूपिनची स्थापना केली. 13 सप्टेंबरमध्ये, वडिल देश बंधूने देशातील तिसरी सर्वात मोठी फार्मा कंपनी ल्यूपिनची सूत्रे सोपवली. या नवीन कंपनीच्या उलाढालीत सुमारे 40 टक्के हिस्सा आहे.
फोर्ब्सची यादीः 50 पेक्षा जास्त वयाच्या टॉप-50 व्यावसायिक महिलांमध्ये 6 भारतीय
फोर्ब्सने आशिया-पॅसिफिकच्या टॉप-50 महिलांची यादी प्रसिद्ध केली आहे ज्यांनी 50 पेक्षा जास्त वयाच्या आणि नवीन पिढीला प्रेरणा दिली आहे…
संघमित्रा बंडोपाध्याय ः व्यवसायाने संगणक शास्त्रज्ञ. 2015 मध्ये, त्या भारतीय सांख्यिकी संस्थेच्या पहिल्या महिला संचालक बनल्या. 2022 मध्ये तिला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
माधबी पुरी बुचः मार्च 2022 मध्ये, बाजार नियामक सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून निवड झाली.
झरीन दारूवालाः 2016 मध्ये स्टँडर्ड चार्टर्ड बँक इंडियाच्या सीईओ बनल्या.
या यादीत फॅशन हाऊसच्या संस्थापक अनिता डोंगरे, सेलच्या अध्यक्षा सोमा मंडल आणि 2022 बुकर पुरस्कार विजेत्या गीतांजली श्री यांचाही समावेश आहे.
याही मुली आहेत… ज्यांना वडिलांच्या व्यवसायात रस नाही
सुमारे 7 हजार कोटी रु. देशातील सर्वात मोठी पॅकेज्ड वॉटर कंपनी बिस्लेरीचे मालक रमेश चौहान यांची मुलगी जयंती यांनी हा व्यवसाय करण्यास नकार दिला. ती गेल्या 13 वर्षांपासून वडिलांचा व्यवसाय सांभाळत होती. बिस्लेरीसाठी टाटा कंझ्युमरसोबत शेवटचा करार झाला होता. त्याचवेळी प्रसिद्ध बिझनेस टायकून कुमार मंगलम यांची मुलगी अनन्याने स्वतःची मायक्रोफायनान्स कंपनी ‘स्वतंत्र’ सुरू केली.