ऑनलाईन टीम / तरुण भारत :
2022-23 या आर्थिक वर्षात 750 बिलियन डॉलर्सची निर्यात करून भारत जगातील पाचवा सर्वात मोठा निर्यातदार बनला आहे. मागील वर्षी भारत नवव्या स्थानावर होता.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केलेले ट्विट शेअर करून, पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात 750 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त निर्यात साध्य केल्याची माहिती दिली. “या कामगिरीबद्दल भारतातील नागरिकांचे अभिनंदन. हीच भावना भारताला आगामी काळात स्वावलंबी बनवेल”, असे मोदींनी ट्विट शेअर करताना म्हटले आहे.
02 सप्टेंबर 2022 रोजी भारतीय अर्थव्यवस्था ब्रिटनला मागे टाकून जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली. त्यानंतर आता आणखी एक विक्रम भारताच्या नावावर झाला आहे. तो म्हणजे 2022-23 या आर्थिक वर्षात 750 बिलियन डॉलर्सची निर्यात करुन भारत जगातला पाचवा सर्वात मोठा निर्यातदार देश बनला आहे. 2021-22 मध्ये भारताने 600 अब्ज डॉलरची निर्यात केली होती. त्यावेळी भारत नवव्या क्रमांकावर होता. कोरोनानंतरचे जागतिक संकट, रशिया-युपेन संघर्षात जागतिक मंदी, चढे व्याजदर, ऊर्जा संकट, उत्पादन बंदचा विचार करता भारताचे हे यश मोठे आहे.
अधिक वाचा : हेच का ते दंगे?; किरीट सोमय्यांचा राऊतांना सवाल