वृत्तसंस्था/ लॉसेन
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या येथे शनिवारपासून सुरू झालेल्या पहिल्या हॉकी 5 पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत पहिल्या दिवशी भारतीय पुरूष हॉकी संघाने पहिल्या सामन्यात यजमान स्वीसचा 4-3 अशा गोलफरकाने पराभव केला तर भारताने पाक बरोबरचा दुसरा सामना 2-2 असा बरोबरीत राखला.
शनिवारी या स्पर्धेतील झालेल्या पहिल्या सामन्यात गुरिंदर सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने स्वीसवर 4-3 अशा गोलफरकाने निसटता विजय मिळविला. या सामन्यात भारतातर्फे मोहम्मद राहीलने दुसऱया आणि 10 व्या मिनिटाला असे दोन गोल, एम. रविचंद्रनने पाचव्या मिनिटाला तसेच कर्णधार गुरिंदर सिंगने 19 व्या मिनिटाला प्रत्येकी एक गोल नेंदविता स्वीसतर्फे जोनास विंक्लरने सहाव्या मिनिटाला, रेनहार्डने 11 व्या मिनिटाला आणि प्रुसीने 16 व्या मिनिटाला गोल केले.
दुसऱया सामन्यात भारताने पाकला 2-2 असे गोलबरोबरीत रोखले. या सामन्यात भारतातर्फे मोहम्मद राहीलने पहिल्या मिनिटाला तर गुरसाहिबजीत सिंगने 18 व्या मिनिटाला गोल केले. पाकतर्फे अर्षदने सातव्या मिनिटाला तर अब्दुल रेहमानने 20 व्या मिनिटाल गोल नोंदविले. या सामन्यात मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. आता या स्पर्धेत भारतीय हॉकी संघाचा पुढील सामना मलेशियाबरोबर होणार आहे.