वृत्तसंस्था/ लखनौ
बहरीन येथे 2 ते 10 जुलै दरम्यान होणाऱया आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघामध्ये दीपक पुनिया आणि अंकित गुलिया यांचा समावेश करण्यात आला आहे.
लखनौ आणि सोनेपत येथे आयोजिलेल्या 20 आणि 15 वर्षांखालील वयोगटाच्या संघ निवडीसाठी निवड चाचणी घेण्यात आली. सदर स्पर्धा 15 वर्षांखालील मुले आणि मुली तसेच 20 वर्षांखालील पुरूष आणि महिला अशा विविध गटात बहरीनमधील मनामा येथे होणार आहे.
ं 15 वर्षांखालील मुली- तनिषा, श्रावणी, दीपांशी, मोनिका, एकता, रंजिता, नेहा, रोनक, पुलकीत, काजल. 15 वर्षांखालील मुले- (फ्रीस्टाईल)- दीपान्शू, दशरथ, ईश्वर, कार्तिक, सलीम, अंकुश, तनिष्क, निशांत, विवेक, बादल चौधरी. 15 वर्षांखालील मुले ग्रीकोरोमन- वरूण, प्रांजल कांगरा, अतुल, आदित्य कुमार, प्रणय, तुषार पाटील, वरूण, सचिन, अभय, हरदीप.
20 वर्षांखालील महिला- स्विटी, अंतिम, रिना, सिटो, तन्नू मलिक, सारिका, प्रियांका, अर्जू, मंजू, प्रिया. 20 वर्षांखालील फ्रीस्टाईल पुरूष- मोहितकुमार, सुजित, मुलायम, जयदीप, दीपक, जाँटीकुमार, आकाश, आशिश, महेंद्र गायकवाड. 20 वर्षाखालील पुरूष ग्रीकोरोमन- रूपिन, सौरभ, अनिल, अंकित गुलिया, दीपक पुनिया, सचिन, रोहित दाहिया, मनोजकुमार, नरिंदर चिमा आणि परवेश.