वृत्तसंस्था/ चेन्नई
पुढील महिन्यात होणाऱया महिलांच्या 20 वर्षाखालील वयोगटाच्या सॅफ फुटबॉल स्पर्धेसाठी प्रमुख प्रशिक्षिका मेमोल रॉकी यांनी 23 जणींचा महिला फुटबॉल संघाची घोषणा केली. भारतीय महिला फुटबॉल संघ त्या स्पर्धेसाठी ढाक्याला रवाना होणार आहे.
बांगलादेशमध्ये होणाऱया स्पर्धेसाठी अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने भारताच्या 20 वर्षाखालील वयोगटाच्या महिलांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघासाठी चेन्नईत 6 जानेवारीपासून सरावाचे शिबिर आयोजित केले होते. या सराव शिबिरात संभाव्य 33 महिला फुटबॉलपटूंचा समावेश होता. सराव शिबिर संपल्यानंतर या स्पर्धेसाठी 23 सदस्यांचा प्रमुख प्रशिक्षिका मेमोल रॉकी यांनी निवडला आहे. गेल्या आठवडय़ात चेन्नईत झालेल्या सराव शिबिरावेळी 20 वर्षाखालील वयोगटाच्या संभाव्य संघाकरिता सरावाचे सामने आयोजित केले होते.
भारतीय महिला फुटबॉल संघ- गोलरक्षक- मोनालिसा देवी, अनशिका, अंजली, बचावफळी- शिल्की देवी, अस्ताम ओरॉन, काजल, शुभांगी सिंग, पूर्णिमा कुमारी, वर्षिका, ग्लेडीस, मध्यफळी- मार्टिना थोकचॉम, काजोल डिसोझा, बबिना देवी, नितू लिंडा, तानिया कांती, शैलजा, आघाडीफळी- लिंडा कॉम, अपूर्णा नारझरी, सुनीता मुंडा, सुमती कुमारी, नेहा, सोनाली सोरेन आणि अनिता कुमारी.