वृत्तसंस्था/ बेंगळूर
गोलरक्षक सविताच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला हॉकी संघाने रविवारी रात्री येथून ऑस्ट्रेलियाला प्रयाण केले. भारतीय महिला हॉकी संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात पाच सामन्यांची हॉकी कसोटी मालिका खेळणार आहे.
या दौऱ्यासाठी भारतीय महिला हॉकी संघाच्या उपकर्णधारपदी दीप ग्रेस एक्काची निवड केली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील भारतीय महिला हॉकी संघाचे सामने डीडी स्पोर्ट्स वाहिनीवर प्रक्षेपित केले जाणार आहेत.