पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यात सौहार्दपूर्ण चर्चा
नवी दिल्ली, वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडेन यांच्यात सोमवारी प्रदीर्घ चर्चा झाली आहे. ही चर्चा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झाली. भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्री दृढ असून ती यापुढेही अशीच वृद्धिंगत होत राहील, असा प्रतिपादन दोन्ही नेत्यांनी आपल्या प्रारंभीच्या वक्तव्यात केले.
रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा होत असल्याने जगाचे लक्ष या चर्चेकडे लागले होते. तसेच, भारत आणि अमेरिका यांच्यात ‘दोन अधिक दोन’ चर्चाही होणार असल्याने या चर्चेचे त्यादृष्टीनेही महत्व होते. ही चर्चा अत्यंत सौहार्दपूर्ण आणि सकारात्मक वातावरणात पार पडली.
युक्रेनसह अनेक मुद्दे
चर्चेमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातील परस्पर संबंध, सामरिक भागिदारी, व्यापार, गुंतवणूक आणि इतर द्विपक्षीय तसेच जागतिक मुद्दे ओघानेच आले. प्रमुख चर्चा युक्रेन आणि युद्धामुळे निर्माण झालेली परिस्थिती, तसेच द्विपक्षीय संबंध या दोन मुद्दय़ांवर झाली, असे नंतर दोन्ही देशांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
प्रारंभिक निवेदन
रशियाच्या अध्यक्षांनी युक्रेनच्या अध्यक्षांशी थेट चर्चा करावी, अशी सूचना मी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना केली आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या प्रारंभीच्या निवेदनात स्पष्ट केले. बुचा येथील निरपराध नागरिकांवरचे अत्याचार आणि तेथील नरसंहाराविषयी त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या नरसंहाराची न्यायोचित चौकशी होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
भारत-अमेरिका संबंध दृढ
भारत आणि अमेरिका हे देश अनुक्रमे जगातील सर्वात मोठी आणि सर्वात जुनी लोकशाही आहेत. त्यांच्यात नैसर्गिक भागिदारी आहे. युपेनमधील परिस्थिती अतिशय चिंताजनक असताना आमच्यात चर्चा होत आहे. दोन्ही देशांमधील ही भागिदारी आणि संबंध आगामी काळात अधिकाधिक दृढ होत जातील. हे संबंध जगाच्या दृष्टीनेही महत्वाचे आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी केले.
राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे निवेदन
भारताने युपेनला मानवतेच्या दृष्टीने केलेल्या साहाय्याची प्रशंसा अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांनी केली. युपेन-रशिया युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे व्यवस्थापन आणि स्थैर्य यासंबंधी भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश एकमेकांशी विचारविमर्श करुन करणार आहेत. दोन्ही देशांमध्ये बळकट अशी सामरिक भागिदारी आहे. ही भागिदारी जागतिक आणि द्विपक्षीय अशा दोन्ही दृष्टीकोनांमधून स्थापन करण्यात आली आहे. असे प्रारंभिक निवेदन राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी केले. त्यांच्या वक्तव्यावरुन अमेरिकेला भारताचे वाटणारे महत्व लक्षात येते, असे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले.
व्यापक आढावा आणि दिलासा
चर्चेत दोन्ही नेत्यांनी भारत-अमेरिका संबंधांचा व्यापक आढावा घेतला. हा आढावा केवळ द्विपक्षीय संबंधांच्या पुरता मर्यादित नव्हता. तर जागतिक राजकारणात दोन्ही देश कोणत्या भूमिका संयुक्तरित्या साकारत आहेत आणि भविष्यकाळात साकारु शकतील यावरही विचार करण्यात आला. युक्रेनसंबंधी भारत स्वतंत्र भूमिका घेईल असे अमेरिकेच्या अधिकाऱयांनी चर्चेनंतर स्पष्ट केले. तसेच रशियाकडून भारत तेल आयात करीत आहे. त्यासंबंधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे कोणतीही विशेष मागणी केलेली नाही, असेही अमेरिकेच्या अधिकाऱयांनी स्पष्ट केले. हा भारताला मोठाच दिलासा आहे.
पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यात झालेली ही चर्चा भारत आणि अमेरिका यांच्यातील 2 अधिक 2 चर्चेच्या आधी पार पडली. भारताचे संरक्षणमंत्री राजनाथसिंग आणि विदेश व्यवहार मंत्री एस. जयशंकर, तसेच अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन आणि विदेश व्यवहार मंत्री अँटोनी ब्लिंकन यांच्यात ही 2 अधिक 2 चर्चा होत आहे, अशी माहिती देण्यात आली.
‘टू प्लस टू’ चर्चेत अंतराळसंबंधी करार केंद्रस्थानी
भारतातर्फे राजनाथ सिंग, एस. जयशंकर यांची उपस्थिती
भारत आणि अमेरिका यांच्यातील ‘टू प्लस टू’ चर्चेत दोन्ही देशांमध्ये अंतराळ परिस्थिती जागरुकता या विषयावर सामंजस्य करार महत्त्वाचा मुद्दा राहिला. अंतराळातील हालचालींवर लक्ष ठेवणे हा त्याचा उद्देश आहे. दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य कराराला चालना देण्यात आली. या ‘टू प्लस टू’ चर्चेसाठी राजनाथ सिंग आणि एस. जयशंकर हे भारताचे दोन मंत्री सध्या अमेरिकेच्या दौऱयावर आहेत. यादरम्यान, वॉशिंग्टनमधील पेंटागॉनमध्ये एका सन्मान सोहळय़ात अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांना गार्ड ऑफ ऑनर दिला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी वॉशिंग्टन डीसी येथे अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीत सहभाग नोंदवला. पाच वर्षांच्या प्रयत्नांनंतर भारत आणि अमेरिका अखेर अंतराळ परिस्थिती जागरूकता (एसएसए – स्पेस सिच्युएशनल अवेअरनेस) सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या कराराच्या मूर्त स्वरुपामुळे अंतराळातील धोक्मयावरील डेटाची देवाणघेवाण एकमेकांना करण्यात मदत होणार आहे.