कोल्हापूर प्रतिनिधी
समाजातील लोकांपर्यंत शासकिय योजनांची माहीती पोहोचवण्यासाठी विद्यार्थी विद्यार्थ्यांना समाजकल्याण कार्यालयात माहीती दिली जाईल. त्याचा उपयोग तळागाळातील लोकांसाठी होईल. अशा विद्यार्थ्यांना समाजात माहीती दुत म्हणून नविन ओळख मिळेल. असे मत समाज कल्याण आयुक्त विशाल लोंढे यांनी व्यक्त केले. ते आज कोल्हापूरात “कल्याणकारी योजनांची माहिती..विद्यार्थ्यांच्या हाती”या उपक्रमाच्या उद्घाटन सोहळाप्रसंगी बोलत होते.
यावेळी बोलताना आयुक्त लोंढे म्हणाले, “कल्याणकारी योजनांची माहिती..विद्यार्थ्यांच्या हाती” या अभिनव उपक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना एकत्र करून मागासवर्गीय नागरिकांसाठी असलेल्या योजनांची माहिती देण्याचे कामकाज सुरू आहे. वेगवेगळ्या महाविद्यालयामधील 50 विद्यार्थ्यांना या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात येत असून हेच विद्यार्थी या योजनांची माहीती समाजातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतील. तसेच या विद्यार्थ्यांना “माहिती दूत” म्हणून ओळखले जाईल.
दर सोमवार ते शुक्रवार दररोज एका महाविद्यालयातील 50 विद्यार्थ्यांना समाज कल्याण कार्यालयामाध्ये बालावून अशा पध्दतीने कल्याणकारी योजनांची माहिती दिली जाणार असल्याची माहीतीही त्यांनी दिली.
सामाजिक न्याय विभागाच्या वतीने या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना विविध कल्याणकारी योजनांची माहिती देऊन त्यांना विविध कल्याणकारी योजनांच्या बाबतीमध्ये प्रबोधित केले बद्दल सामाजिक न्याय विभागाचे काम कौतुकास्पद आहे असे मत प्रा. शरद गायकवाड यांनी व्यक्त केले.
आजच सुरुवात करण्यात आलेल्या या उपक्रमांत महावीर महाविद्यालय, कोल्हापूर येथील विद्यार्थी सहभागी झाले होते. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच इतर बहुजन कल्याण विभाग यांच्या वतीने राविण्यात येणऱ्या विविध कल्याणकारी योजनांची पीपीटी मार्फत या कार्यालयाचे तालुका समन्वयक श्रीमती सुरेखा डवर, श्री. सचिन परब व श्री. सचिन कांबळे यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यालय अधिक्षक सहायक आयुक्त सचिन पाटील, समाज कल्याण कार्यालय कोल्हापूर, प्रा.श्वेता परूळेकर, प्रा.अंकुश गोंडगे, प्रा.शैलेंद्र सडोलीकर, समान संधी केंद्र प्रमुख, महावीर महाविद्यालय कोल्हापूर उपस्थित होते.