ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याची घटना ताजी असतानाच उल्हासनगरमधील मनसेचे विभाग अध्यक्ष योगीराज देशमुख यांना तीन ते चार जणांनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. देशमुख यांना मारहाण करणारा मनसेच्या वाहतूक सेनेचाच पदाधिकारी आहे.
योगीराज देशमुख यांनी उल्हासनगरमधील मनसे वाहतूक सेनेचे सरचिटणीस अमित फुंदे यांनी शासकीय भूखंडावर अनधिकृत पार्किंग सुरू केल्याची तक्रार महानगरपालिका, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयात केली होती. त्याचा राग फुंदे यांच्या मनात होता. याच रागातून गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास फुंदे याच्यासह आणखी तिघांनी देशमुख यांना म्हारळ गावाजवळील डीमार्ट परिसरात गाठून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. यात देशमुख जखमी झाले आहेत. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
अधिक वाचा : राहुल गांधींच्या डोक्यातच पेगासस : अनुराग ठाकूर