माजगाव येथील महिलेला शिलाई मशीन प्रदान
इनरव्हील क्लब सावंतवाडीला यावर्षी पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत.व डिस्ट्रिकला शंभर वर्ष पूर्ण होत आहे. याचे औचित्य साधून माजगाव येथील रेणुका अर्जुन लमानी या महिलेला शिलाई मशीन देण्यात आली . ही महिला अपंग असून तिला आत्मनिर्भर बनवण्यासाठी स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे धाडस येण्यासाठी शिलाई मशीन देण्यात आली आहे . इनरव्हील क्लब अध्यक्ष रिया रेडीज ,क्लब सेक्रेटरी डॉक्टर मीना जोशी ,ट्रेझरर श्रेया नाईक ,आय. एस . ओ डॉ. नेत्रा सावंत तसेच मीनल नाईक, सोनाली खोर्जुवेकर, हे सर्व सदस्य उपस्थित होते. रूपा मुद्राळे यांच्या माध्यमातून ही मशीन देण्यात आली .