बेळगाव : बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी साई कॉलनी, कणबर्गी रोड आणि कणबर्गी परिसराला भेट देऊन पडझड झालेल्या घरांची पाहणी केली आणि परिसरातील रहिवाशांच्या तक्रारी जाणून घेतल्या. तसेच येथील रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांची पाहणी केली.
यावेळी राजू सेठ म्हणाले, “लोकांच्या तक्रारी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. हेल्पलाइन सुरू झाल्याने बेळगावच्या नागरिकांना अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचणे सोपे जाईल, परंतु आमदार असल्याने भेट देणे हे माझे कर्तव्य आहे. मतदारसंघातील लोकांच्या तक्रारी वैयक्तिक पातळीवर जाणून घेतल्या जातील. तसेच या भागातील नागरिकांच्या हिताचा विचार करूनच समस्या सोडवल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.