उद्यापासून सुरू होणार विमानसेवा
प्रतिनिधी /पेडणे
मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानसेवा गुरुवार दि. 5 जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यामुळे विमानतळावरून मोठय़ा प्रमाणात वाहनांची रहदारी सुरू होणार आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत आणि सुरक्षित राहण्यासाठी सुकेकुळण ते मोपापर्यंतच्या महामार्ग तयार झाला आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी सदर मार्गाची पाहणी केली. यावेळी रस्ता विभागाचे प्रधान अभियंता आत्माराम गावडे, पेडणे विभागाचे अभियंता लक्ष्मण नाईक त्यांच्या सोबत होते.
यावेळी वारखंड नागझर पंचायतीच्या सरपंच गौरी जोसलकर, पेडणे पोलीस निरीक्षक दत्ताराम राऊत, मोपा पोलीस निरीक्षक निनाद देऊलकर, मोपा वाहतूक पोलीस निरीक्षक महेश केरकर, पेडणे वाहतूक पोलीस निरीक्षक विश्वजीत तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. विमानतळ दि. 5 रोजी पासून सुरू आहे. त्यामुळे वाहतूक वाढणार त्यामुळे मार्गावर कुठल्याही प्रकारचा अडथळा होऊ नये, याची खबरदारी घेण्याचे निर्देश अधिकाऱयांना दिले.
अपघात होण्याची ज्या ठिकाणी शक्मयता आहे त्या ठिकाणी तिथे रंब्बल घालण्याच्या सूचना आमदार प्रवीण आर्लेकर यांनी दिल्या. कुठल्याच प्रकारची अडचण वाहतूक व्यवस्थेला होऊ नये यासाठी सूचना प्रवीण आर्लेकर यांनी करत असताना पेडणे तालुक्मयात या मार्गावर भविष्यात मोठय़ा प्रमाणात वाहतुकीचे कोंडी होणार आहे .त्यासाठी नियंत्रण वाहतूक अधिकारी सरकारी यंत्रणेने वेळोवेळी लक्ष ठेवावे आणि आपलं काम जोख बजावावे असेही निर्देश यावेळी प्रवीण आर्लेकर यांनी या अधिकाऱयांना दिले.
अपघात क्षेत्रात दिशादर्शक फलक लावा
या रस्त्याच्या बाजूला घरे असल्याने त्याठिकाणी अपघात होण्याची शक्मयता आहे. त्याठिकाणी दिशादर्शक फलक लावावे. तसेच वेगावर नियंत्रण राखण्यासाठी खास रंब्लर घालावे, अशी सूचना यावेळी आमदार प्रवीण आर्लेकर यांनी केली.