ढोकळा हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वानाच आवडतो. शिवाय तो खाण्यास हलका आणि आरोग्यासाठीही आरोग्यदायी आहे. आज आपण हेल्दी आणि स्वादिष्ट रवा ढोकळ्याची रेसिपी जाणून घेणार आहोत. हा ढोकळा बेसन ढोकळ्यापेक्षा थोडा वेगळा आहे,त्याची चवही वेगळी आहे आणि हा ढोकळा घरी सहज बनवता येतो.चला तर मग याची रेसिपी जाणून घेऊयात.
साहित्य
बारीक रवा – १ कप
आंबट दही – १ कप
बारीक चिरलेली हिरवी मिरची
मीठ चवीनुसार
१ चमचा इनो
१ चमचा तेल
१ चमचा मोहरी
कढीपत्ता
कृती
एका मोठ्या बाउलमध्ये 1 कप रवा घ्या. त्यात 1 कप आंबट दही आणि चवी नुसार मीठ घालून सर्व मिसळून घ्या. मिश्रण घट्ट वाटले तर थोडंसं पाणी घालून पातळ करा. यानंतर 15 मिनिटे मिश्रण झाकून ठेवा. पंधरा मिनिटानंतर मिश्रणात २ मिरच्या बारीक कापून घाला.यानंतर त्यामध्ये एक पॅकेट इनो टाका. इनोवार एक चमचा पाणी टाका आणि तो ऍक्टिव्हेट करून घ्या. एकाच दिशेने मिश्रण ढवळून घ्या. आता एका भांड्यात 2 ग्लास पाणी घ्या त्याच्या तळाशी स्टॅन्ड ठेवून तेलाने ग्रीस केलेल्या छोट्या भांड्यात मिश्रण ओता आणि मिश्रणाचे भांडे आत ठेवून 15 मिनिटे उकडून घ्या. उकडून झाल्यावर ढोकळा काढण्याची घाई करू नका. त्यावर राई, मिरची, कढीपत्ताची फोडणी करून घाला. ढोकळ्याचे चौकोनी आकारात तुकडे करा आणि सॉस किंवा चटणी सोबत सर्व्ह करा.