वाहतुककोंडी अंन पार्कींगच्या समस्येमुळे पर्यटक हैराण; दोन्ही वाहनतळासोबतच पठार ते हेरीटेज वाडी पर्यंत दुतर्फा वाहनांची पार्किंग अंन वाहतुक कोंडी
कास प्रतिनिधी
कास पुष्प पठारवरील नैसर्गिक रंगीबेरंगी फुलांचा हंगाम ऐन बहरात आला असुन विविधरंगी फुलांनी पठार बहरून गेले आहे हा रंग सोहळा पाहण्यासाठी गेल्या चार दिवसापासुन पर्यटकांनी तोबा गर्दी केली असुन आज पर्यटकांच्या गर्दीने उच्चांक गाठल्याचे दिसून आले मात्र एकाच दिवशी एवढी गर्दी झाल्याने वन समितीचे व्यवस्थापन दुपारपासुन कोलमडल्याचे दिसत होते वाहनतळ हाऊसफुल होऊन रस्त्याच्या दुतर्फा वाहन पार्किंग झाल्याने व मधोमध काही वाहने बंद पडल्याने बराच वेळ वाहतुक कोंडी झाली होती अखेर काही पर्यटकांनी पठार न पाहता परतीचा प्रवास घेतल्याचे दिसुन आले.
सलग पाच दिवस सुट्टी असल्याने पर्यटकांनी कास पुष्प पठारवरील फुलांचा नयनरम्य देखावा पाहण्यासाठी धाव घेतली असुन गेल्या चार दिवसांपासून पर्यटकांच्या गर्दीत वाढ झाली आहे सकाळी दहा वाजताच घाटाई मार्ग व कास तलाव कडील वाहनतळ हाऊसफुल झाली होती त्यांनंतर पर्यटकांचा लोंढा दिवसभर कायम राहील्याने घाटाई फाट्यावर वाहतुक कोंडी होऊ लागली अखेर वाहनतळ हाऊस फुल झाल्याने पठार पासून हेरिटेजवाडी हॉटेल पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा पर्यटकांनी वाहन पार्किंग केली अनं पायी प्रवास करत पठार गाठले पठारावरील गुलाबी थंडी सकाळपासुन सतत पडणार्या पावसाच्या रिपरीपीत भिजन्यासोबतच गेंद ,तेरडा . सोनकी . टोपली कारवी , चवर , नाल , कापरू निलिमा आदी फुलांना मोठ्या प्रमाणात बहर असुन या फुलांचा रंगसोहळा पाहुन पर्यटक आनंदुन गेले कुमुदिनी तळ्यासोबतच कास तलाव वर पर्यटकांनी गर्दी केली होती.
घाटाई फाट्यावर झालेल्या वाहतुक कोंडीने बामणोली तापोळा जुंगटी कडे जाणाऱ्या वाहतुकीला मोठा फटका बसला बराच वेळ वाहने ट्रफीकमध्ये अडकुन पडली होती कास पठार हुन बामणोलीकडे जाणारा मार्ग बंद असल्याने व घाटाई मार्गावरून लांब पल्ला व कच्चा रस्ता असल्याने पठार पाहुन पुढे जाणार्या पर्यटकांनी अखेर परतीचा प्रवास घेतला त्यामुळे बामणोली व वजराई धबधब्यावर पर्यटकांची गर्दी कमी दिसुन येत असल्याने तेथील व्यवसायीकांना फटका बसत आहे.
दरदिवशी ऑनलाईन बुकींगने तिन हजार पर्यटकांना प्रवेश दिला जातो व तिन हजारपर्यंतच ऑनलाईन बुकींग घेतले जाते मात्र ऑफलाईनही तिकीट मिळत असल्याने पर्यटक एकाच दिवशी म्हणजेच सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत त्यामुळे ऑनलाईन बुकींग करणारांची कोंडी होत असुन बुंकींग करुनही सोई सुविधा आभावी अनेक समस्येला सामोरे जावे लागत आहे.
सलग सुट्टया असल्याने पठार पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होणार वाहनांच्या रांगा लागणार हे सर्वश्रुत असतानाही वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सोबतच पोलीस प्रशानाने पठार परिसराकडे पाठ फिरवल्याचे दिसुन आले त्यामुळे वन समितीच्या कर्मचार्यांची तारंबळ ऊडाली ऐवढ्या जनसमुदायाला तोंड देताना काही ठिकाणी किरकोळ शाब्दिक बारही ऊडत होते.
सातारा कास मार्गाचे रुदीकरण झाल्याने काही अंशी वाहतुक कोंडी टळत असली तरी एकाच दिवशी पठारवर होणारी गर्दी टाळण्यासाठी सुट्टीच्या दिवशी फक्त ऑनलाईनच प्रवेश कास बामणोली जुंगटी सहयाद्री नगर परिसरातील नवीन पर्यंटन स्थळे पठार विकीसीत करणे कास पठार वरून जाणार्या बामणोली रोडची निर्मीती करण्यासोबत घाटाई रोडचे रूंदीकरण व मजबुतीकरण करणे