कधी कधी चटपटीत खावेसे वाटते पण मग आरोग्याचा विचार येतो. अशा वेळी सोयाबीन आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.आज आपण सोयाबीन पासून चटपटीत स्नॅकची रेसिपी जाणून घेणार आहोत.
साहित्य
सोयाबीन
लाल तिखट – १ चमचा
हळद – अर्धा चमचा
धने पावडर – १ चमचा
जिरा पावडर – १ चमचा
गरम मसाला – १ चमचा
आले लसूण पेस्ट – १ चमचा
दही – ३ चमचे
चवीनुसार मीठ
बेसन – १ चमचे
कॉर्न फ्लोअर – २ चमचे
तांदळाचे पीठ – २ चमचे
कृती
सर्वप्रथम एका भांड्यात पाणी गरम करून घ्या. त्यामध्ये सोयाबीन वड्या घाला. ५ मिनिटांनी सर्व सोयाबीन वड्यांमधून पाणी काढून घ्यावे. यानंतर त्यामध्ये लाल तिखट, हळद , धने, जिरे पावडर, गरम मसाला , आले लसूण पेस्ट आणि दही घालून सर्व एकत्र हलवून घ्या. यांनतर त्यामध्ये मीठ, बेसन पीठ, कॉर्न फ्लोअर आणि तांदळाचे पीठ घालून पुन्हा एकदा हलवून घ्या. यानंतर कढईमधे तेल गरम करा. आणि सर्व सोयाबीन तळून घ्या. गरमागरम आणि चटपटीत सोयाबीन ६५ सर्व्ह करा.