द्वितीय श्रेणीतील कर्मचाऱयांना बढती मिळाल्याने कार्यालयांतर्गत अन्य ठिकाणी नियुक्ती : पाच कर्मचाऱयांची कार्यालय व्यवस्थापकपदी बढती
बेळगाव : महापालिकेतील द्वितीय श्रेणीतील कर्मचाऱयांना बढती मिळाल्याने त्यांची कार्यालयांतर्गत अन्य ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच काही कर्मचाऱयांची बदली झाल्याने पदे रिक्त झाली आहेत. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱयांच्या जबाबदाऱयांमध्ये बदल करण्यात आला असून 22 कर्मचाऱयांची अंतर्गत बदली झाली आहे.
महापालिकेत द्वितीय श्रेणी क्लार्क म्हणून सेवा बजावणाऱया पाच कर्मचाऱयांची कार्यालय व्यवस्थापकपदी बढती मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे व्यवस्थापक पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. तसेच त्यांच्या जागी अन्य कर्मचाऱयांची नियुक्ती करण्याचा आदेश महापालिका आयुक्तांनी बजावला आहे. काही कर्मचारी अन्य महापालिकेत बदली होवून गेले. त्यामुळे त्या जागा देखील रिक्त झाल्याने त्या पदाची जबाबदारी मनपातील कर्मचाऱयांवर सोपविली आहे. सामान्य प्रशासन विभागातील तीन कर्मचाऱयांना व्यवस्थापकपदी बढती मिळाल्याने या विभागातील निम्मा कर्मचारी वर्ग बदलला आहे. तसेच महसूल व कायदा विभागातील कर्मचाऱयांच्या जबाबदाऱयांमध्ये बदल केला आहे.
कर्मचाऱयांचे नाव | सध्या कार्यरत असलेला विभाग | बदली झालेला विभाग |
टी. बी. शेळीकेरी | सामान्य प्रशासन विभाग | उपविभाग दक्षिण-2 |
शैला नायकर | महसूल विभाग | सामान्य प्रशासन विभाग |
विजयलक्ष्मी पाटील | नगरयोजना विभाग | महसूल विभाग |
सातक्का तळवार | महसूल विभाग | पथदीप देखभाल विभाग |
महांतेश नायक | उपविभाग दक्षिण-2 | उपविभाग दक्षिण 1 व 2 |
जोतिबा अनगोळकर | सार्वजनिक बांधकाम विभाग | उपविभाग दक्षिण 2 |
रेखा निलण्णावर | कायदा विभाग | सार्वजनिक बांधकाम विभाग (डीएम विभाग) |
भरत तळवार | कायदा विभाग | सामान्य प्रशासन विभाग |
शिवाजी एस. जाधव | सामान्य प्रशासन विभाग | नगरयोजना विभाग |
शबाना करिहाजी | सामान्य प्रशासन विभाग | सामान्य प्रशासन विभाग |
महावीर यलगुद्री | महसूल विभाग | सामान्य प्रशासन विभाग |
मीनाक्षी तोंगरी | महसूल विभाग | मालमत्ता नोंदणी विभाग |
संतोष कांबळे | गरीबी निर्मूलन विभाग | सामान्य प्रशासन विभाग |
गीता पाटील | गरीबी निर्मूलन विभाग | पीएम. स्व-निधी, समृद्धी विभाग |
महादेव चंदगडकर | निवडणूक विभाग | खासबाग स्मशानभूमीतील कामकाज |
सुभाष कोलकार | कौन्सिल विभाग | उपविभाग दक्षिण-2 |
शोभा कोलकार | जनगणती विभाग | पीएम स्व-निधी समृद्धी विभाग |
संतोष कुरबर | अतिक्रमण निर्मूलन विभाग | जनगणती आणि कौन्सिल विभाग |
सुवर्णा गाडीवड्डर | सामान्य प्रशासन विभाग | उपविभाग दक्षिण-1 |
सुवर्णा हुवण्णावर | उपविभाग दक्षिण-1 | महसूल विभाग |
निर्मला हंजगी | सामान्य प्रशासन विभाग | बदली झालेल्या कर्मचाऱयांच्या ठिकाणी, सामान्य प्रशासन विभाग |
सुरेश द्यावण्णावर | सार्वजनिक बांधकाम विभाग | सामान्य प्रशासन विभाग, आरटीआय आणि एनपीएस कामाची जबाबदारी |